- राज्यघटनेचा जन्म बघा झाला।
- पताका फुलांनी भारत सजला ।
- झेंडा डौलात तोऱ्यात फडकला।
- सर्वांना आज मोठा आनंद झाला॥१॥
- सव्वीस जानेवारी घटना आली।
- घटनेने अस्पृश्यता नष्ट केली।
- सामाजिक लोकशाही जन्मा अाली।
- गणराज्याला ही सुरुवात झाली॥२॥
- राज्यघटनेचे एक शिल्पकार।
- विश्वरत्न डाँक्टर आंबेडकर ।
- सर्वांना दिले तयांनी अधिकार।
- जनकल्याण हे घटनेचे सार॥३॥
- घटना आली बघा समता आली।
- बंधुता आणि न्याय देवता आली।
- भेदभाव नष्ट करायला आली।
- जातीभेद नष्ट करायला आली॥४॥
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर ,अमरावती.
- भ्र. ध्व:-८०८७७४८६०९
0 टिप्पण्या