- चल राणी दोघे फिरु
- मकरंद मस्त खाऊ
- कुहुकुहु नादासवे
- वनी रंगुनिया जाऊ
- दाट दाट गर्द झाडी
- पान फुल येथे शोधू
- रंग रुप पाहुनिया
- कुहुकुहु असे वधू
- मोरपंखी तो पिसारा
- नाच गाणे संगे गाऊ
- साद देऊ एकमेका
- कुहुकुहु बोल भाऊ
- किलबिल पक्षी गुंज
- भाषा थोडी त्यांची शिकू
- घरट्यात त्यांच्यासवे
- मकरंद गोड चाखू
- चैत्र पालवी नव्हाळी
- फुल फुल देई हाळी
- गीत त्यांचे गात गात
- ताल सुर देऊ टाळी
- गुलमोहरचा भार
- लाल लाल रंग पेलू
- तप्त ऊन्हातही सारे
- हसतच दुःख झेलू
- जुने सारे विसरुनी
- नव निर्मितीच शोध
- हसतच जगण्याचा
- चल घेऊ आज बोध
- रांग बगळ्याच्या संगे
- चिऊ काऊ मैना पाहू
- अंगभर पंख लेहू
- संचारत दोघे जाऊ
- बोरबाभळ झाड
- झुके विहिरीत खोल
- पाखराची करामत
- खोपा मध्ये ऐकू बोल
- कुहुकुहु नाद घुमे
- मोरपंखी नाच फुले
- छोट्या छोट्या गवतात
- पाखरांची झुले मुले
- -मुबारक उमराणी
- राजर्षी शाहू काॅलनी
- शामरावनगर, सांगली
- मो.९७६६०८१०९७
0 टिप्पण्या