मुंबई : पाठक बाई या गोड व्यक्तिरेखेला प्रेक्षक अजूनही विसरू शकले नाही आहेत. ही भूमिका निभावणारी अभिनेत्री अक्षया देवधर ही प्रेक्षकांची आवडती आहे आणि त्यांची लाडकी अक्षया आता झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या हे तर काहीच नाय या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतेय आणि प्रेक्षकांना आवडतेय सुद्धा. डेलीसोप केल्यानंतर कथाबाह्य कार्यक्रम करतानाच अनुभव खूप वेगळा आहे असे अक्षया म्हणते.
त्याबद्दल सांगताना अक्षया म्हणाली, मी या आधी कॉलेजमध्ये सुद्धा कार्यक्रमांसाठी अँकरिंग केलं आहे त्यामुळे अगदीच पहिला अनुभव आहे असं नाही म्हणता येणार. हे तर काहीच नाय हा कार्यक्रम सुद्धा माज्यासाठी एक वेगळी संधी घेऊन मला अगदी योग्यवेळी मिळाला असं मी म्हणेन. खूप वर्ष डेलीसोप केल्यानंतर आता कथाबाह्य कार्यक्रम करतानाचा अनुभव खूप वेगळा आहे असं मी म्हणेन. सगळ्या मोठा बदल म्हणजे रोज शूटिंग करण्यापासून ते आठवड्यातून २ दिवस शूटिंग करणे. तसंच सूत्रसंचालन करत असताना लाईव्ह ऑडियन्सच्या रिक्शनवरून आपल्याला ऑन द स्पॉट इम्प्रोवाईज करायचं असतं. आपल्या सूत्रसंचालनातून प्रेक्षकांना कार्यक्रमाशी जोडून ठेवायचं असतं. हे खूप आव्हानात्मक आहे पण मी सिद्धू दादा आणि निलेश यांच्याकडून जितके शिकता येईल तेवढं शिकायचा प्रयत्न करतेय.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या