नवी दिल्ली : हिंदुस्थानमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. सध्या दिवसाला दीड लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनासोबत ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. सध्या देशात ओमिक्रॉन बाधितांचा आकडा चार हजार पार गेला आहे. ओमिक्रॉन बाधितांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे दिसत नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले होते, परंतु आता एक गंभीर स्वरुपाचे लक्षण दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.
द डेली एक्सप्रेच्या वृत्तानुसार, कोविड-१९ मध्ये दिसणारे दुर्मीळ लक्षण ब्रेन फॉग ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्येही पाहायला मिळत आहे. कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांनी ब्रेन फॉग या समस्येचा सामना करत असल्याचे सांगितले आहे. ऑक्टोबर २0२0 मध्ये पहिल्यांदा ब्रेन फॉग या लक्षणाबाबत तज्ज्ञांना माहिती मिळाली होती. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर ब्रेन फॉग हे लक्षण दिसले होते. परंतु सर्वच रुग्णांमध्ये हे लक्षण न दिसल्याने ताप, थंडी, श्वास घेण्यास त्रास, खोकला किंवा शरीरात दिसणार्या अन्य लक्षणांमध्ये याचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता ओमिक्रॉन बाधितांमध्येही हे लक्षण दिसू लागले आहे.
अलबामा विश्वविद्यालय बमिर्ंघमची न्यूरोलॉजिस्ट डॉ. र्शुति अग्निहोत्री यांनी या लक्षणाबाबत माहिती दिली आहे. ब्रेन फॉगमुळे रुग्णांना तीव्र डोकेदुखी आणि विसरभोळेपणा ही समस्या होऊ शकते, असे डॉ. अग्निहोत्री यांनी सांगितले. रुग्ण ताप आणि श्वास घेण्याच्या त्रासापासून सुटका मिळवतात, पण डोकेदुखी आणि विसरभोळेपणा सारख्या समस्यांची तक्रार करतात. यालाच ब्रेन फॉग बोलले जाते. अनेक रुग्णांना आपण लक्ष केंद्रीत करू शकत नसल्याचेही म्हटले आहे.
यूनिवर्सिटी कॉलेज लंडनचे डॉ. मायकल जॅन्दी यांनीही याबाबत माहिती देताना सांगितले की, ब्रेन फॉग ही मेडीलकर टर्म नाही. परंतु लक्षणे पाहून हे नाव देण्यात आले आहे. जे लोक कोरोनामुक्त झाले त्यांच्यामध्ये हे लक्षण जास्त दिसले आहे. डोकेदुखी, विसरभोळेपणा आणि मायग्रेनसारखी समस्या रुग्णांना होत आहे. कोरोनामुक्त झालेल्या जवळपास २0 टक्के लोकांना हा त्रास जाणवत असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे कोरोनावर मात केल्यानंतर १६ महिन्यांनीही हे लक्षण दिसले आहे.
0 टिप्पण्या