Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

महिला पोलिसांना आता १२ ऐवजी ८ तास ड्युटी

    मुंबई : महाराष्ट्रातील महिला पोलिस कर्मचार्‍यांसाठी आनंदाची वार्ता आहे. सरकारने त्यांच्या ड्युटीचे तास कमी केले आहेत. याआधी महिला आणि पुरूष पोलिस कर्मचार्‍यांना १२ तास ड्युटी करावी लागत होती. मात्र, आता महिला पोलिस कर्मचार्‍यांना फक्त ८ तासच ड्युटी असेल.

    राज्याचे पोलीस महासंचालक (जीडीपी) संजय पांडे यांच्या वतीने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात महिला पोलिस कर्मचार्‍यांसाठी आता १२ तासांऐवजी ८ तास ड्युटी होणार आहे. महिला पोलीस कर्मचार्‍यांसाठीचा हा नवीन निर्णय प्रायोगिक पातळीवर लागू करण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे, पुरूष आणि महिला पोलिस कर्मचार्‍यांना १२ तासांची शिफ्ट असते. गुरुवारी पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, महिला कर्मचार्‍यांसाठी आठ तास ड्युटी ही पुढील आदेश येईपयर्ंत लागू असणार आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, महिला अधिकार्‍यांना काम आणि वैयक्तिक जीवनात चांगला समतोल साधता यावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी हा निर्णय नागपूर शहर, अमरावती शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये लागू करण्यात आला होता.

    (Images Credit : Navbharat Times)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code