Header Ads Widget

कोरोना हा आजार होता, आता त्याचा बाजार केला.!

    मनसे आमदार राजू पाटील यांचे टीकास्त्र

    डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमध्ये केडीएमसीकडून विभा कंपनीच्या जागेत ५३0 बेडसचे कोविड सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. येत्या काही दिवसात हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयाची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधार्‍यांसह प्रशासनाला लक्ष्य केले आहे. आमदार पाटील यांनी बोलताना सांगितले की कोरोना हा आजार होता, आता बाजार झाला केला आहे.

    कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांना उपचारासाठी केडीएमसीने तयारी सुरू केली आहे. आजएमआयडी मधील विभा कंपनीच्या जागेवर उभारण्यात येणार्‍या रुग्णालयाची कल्याण डोंबिवली महापालिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण आणि आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी आज पाहणी केली. यावेळी खासदार शिंदे यांनी ५३१ खाटाच्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्यात आहे. या रुग्णालयात लहान मुलासाठी ४0 आयसीयू आणि ४0 ऑक्सिजन खाटा असलेला स्वतंत्र बालरुग्ण कक्ष तयार करण्यात आला आहे. पुढील आठवड्यापासून हे रुग्णालय गरज पडल्यास सुरू केले जाणार असे यावेळी सांगितले. मात्र या पाहणी नंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी यांच्यावर टीका केली आहे.

    मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कोरोना हा आजार होता, आता बाजार झाला केला आहे. नवीन होणारा कोरोना सेंटर हे नक्कीच जनतेचा फायद्याचं असेल प्रशासनाला गरज असेल तिथे आम्ही सकारात्मक राहू मात्र जुन्या कोविड सेंटर्सचे ऑडिट होणं देखील होणे गरजेचे आहे. मागच्या वेळेस जसे घोळ झाले तसे आता व्हायला नको याबाबत आमच लक्ष असल्याचा चिमटा आमदार पाटील यांनी काढला. यावेळी आमदार यांनी शिवसेना माजी नगरसेवक आणि सभापती दीपेश म्हात्रे यांच्यावर अडकून टीका केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या