Recent in Technology

Advertisement

Breaking News

भोग नशिबाचे

    तुच्छ लेखले सर्वांना
    अपशब्द वापरले
    गरिबांच्या श्रमावरी
    माझे कुटुंब पोसले
    केला जुलूम अन्याय
    झाले मलिन चारित्र्य
    घडा पापांचा भरला
    नाही उरले पावित्र्य
    अती वाईट वागलो
    कडू मिळाली ही फळे
    आता भोगतोय दुःख
    अश्रू न सांगता गळे
    दिन चांगले येता मी
    उतमात फार केला
    नियतीस नसे मान्य
    बोजवारा मग झाला
    माझ्या पापांचा मी धनी
    कोणी नाही वाटेकरी
    जीवनाच्या भविष्याचा
    मीच झालो मारेकरी
    नशा माज संपत्तीचा
    अंगी जडला हा रोग
    दोष कुणास मी देवू
    माझ्या नशिबाचे भोग
    -युवराज गोवर्धन जगताप
    काटेगाव ता.बार्शी
    जिल्हा सोलापूर
    8275171227

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code