मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेली मानहानीची तक्रार अन्य महानगर दंडाधिकार्यांकडे वर्ग करण्याची अभिनेत्री कंगना राणावतची मागणी मुख्य महानगर दंडाधिकार्यांनी फेटाळली होती. हा निर्णय सत्र न्यायालयाने शुक्रवारी योग्य ठरवला.
आपल्याला या न्यायालयावर विश्वास नसल्याचा आरोप करत कंगनाने अख्तर यांची तक्रार अंधेरी येथील महानगर दंडाधिकार्यांकडून अन्य महानगर दंडाधिकार्यांकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.
अख्तर हे बॉलिवूडमधील खंडणीखोर आहे, असा आरोप करून त्यांच्याविरोधात कंगनाने प्रतितक्रार केली होती. तीही अन्य महानगर दंडाधिकार्यांकडे वर्ग करण्याची मागणी कंगनाने केली होती. मात्र मुख्य महानगर दंडाधिकार्यांनी कंगनाची मागणी फेटाळली होती. या निर्णयाविरोधात कंगनाने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या