अमरावती :- विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. विभागीय उपसंचालक माहिती कार्यालयात आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिन मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी वृत्तपत्राचा पाया रचला. त्यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले असून पत्रकारांसाठी त्यांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शक ठरेल. असे श्री. पवार यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी माहिती सहाय्यक पल्लवी धारव, लेखापाल विजया लोळगे, वरिष्ठ लिपिक विश्वनाथ धुमाळ, मनोज थोरात, सुनील काळे, लिपिक रुपेश सवाई, दिनेश धकाते, वैशाली ठाकरे, कॅमेरामन नितीन खंडारकर, कुमार हरदुले, छायाचित्रकार मनीष झिमटे, वाहनचालक रवींद्र तिडके, विजय आठवले, गजानन पवार, आदी उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयातील फोटो एडिटर सागर राणे, लेखापाल योगेश गावंडे, प्रतीक फुलाडी, कोमल भगत, राजश्री चोरपगार, सुधीर पुनसे, हर्षल हाडे, प्रतिक वानखडे यांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या