Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

जिल्ह्यात सर्वदूर विकासकामांना चालना - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

    * आठ कोटींहून अधिक निधीतून विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

    अमरावती : श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील पर्यटक विसावा केंद्राच्या पुढील टप्प्याचे काम, यावली-वऱ्हा राज्य मार्ग सुधारणा, तिवसा क्रीडा संकुलात सभागृह अशा अनेक महत्वपूर्ण कामांचे भूमीपूजन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले.

    जिल्ह्यात सर्वदूर पायाभूत सुविधांची विविध कामे पूर्णत्वास जात असताना अनेक नव्या कामांना चालना देण्यात येत आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये निधीतून यावली-आडगाव- मोझरी- वऱ्हा राज्यमार्ग सुधारणा, सुमारे ७० लक्ष रुपये निधीतून तिवसा क्रीडा संकुलात बहुउद्देशीय सभागृह, तसेच ६८ लक्ष रुपये निधीतून कौंडण्यपूर येथे पर्यटक विसावा कामाच्या पुढील टप्प्याचे, जि. प. शाळेच्या शिंदवाडी येथील वर्गखोल्या बांधकाम, ८५ लक्ष निधीतून अंजनसिंगी कौंडण्यपूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, सुमारे ६९ लक्ष निधीतून अंजनगाव मसदी रस्ता सुधारणा, तळेगाव ठाकूर येथे सुमारे ४९ लक्ष निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राची ऑपरेशन थिएटर दुरुस्ती, नवीन सुविधा, कुंपण भिंत, रस्ता काँक्रीटीकरण, सुमारे १० लक्ष निधीतून सार्वजनिक सभागृहाचे आदी कामांचे भूमीपूजन, तसेच दुर्गवाडा, धारवाडा, अलवाडा ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले.

    जि. प. सभापती पूजा आमले, पं. स. सभापती शिल्पा हांडे, संदीप आमले, वैभव वानखडे, मुकुंदराव देशमुख, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी चेतन जाधव आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code