Header Ads Widget

अभिनेत्री कीर्ती सुरेश कोरोनामुक्त

    चेन्नई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री कीर्ती सुरेश कोरोनामुक्त झाली आहे.

    पोंगलच्या उत्साही वातावरणात कोरोनामुक्त झाल्याचा आनंद कीर्तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. यासंदर्भात कीर्तिने ट्विटरवर संदेश जारी करत आनंद व्यक्त केलाय. या संदर्भातील आपल्या ट्विटर संदेशात कीर्ति म्हणाली की, आजच्या काळात नकारात्मक असणे सकारात्मक आहे. आपले प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभारी आहे. आशा आहे, आपण पोंगल आणि संक्रांत उत्तमरित्या साजरी केली असेल. असे कीर्तिने आपल्या संदेशात नमूद केलाय.

    कीर्ति सुरेश एक सशक्त अभिनेत्री असून संपूर्ण देशभरात तिचा चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी कीर्ति कोरोना पॉझिटीव्ह आली होती. परंतु, आता ती कोरोनामुक्त झाल्यामुळे तिच्या चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केलाय. तर कीर्तिने देखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कोरोनामुक्तीचा आनंद व्यक्त करत संवाद साधला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या