मुंबई : जय भीम या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. जय भीम हा दाक्षिनात्य सिनेमा आता ऑस्करच्या यूट्युब चॅनेलवर दिसणार आहे. हा मान मिळणारा जय भीम हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी आयएडीबीने २0२१ मधल्या लोकप्रिय चित्रपटांची यादी जाहीर केली. यात जय भीम सिनेमाचे स्थान प्रथम क्रमांकाचे होते. इतरही अनेक पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झाले. याचसोबत हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आणि जय भीम हा दाक्षिनात्य सिनेमा आता ऑस्करच्या यूट्युब चॅनेलवर दिसणार आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अन्यायग्रस्त कुटुंब आणि त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहणारा वकिल यांचा प्रस्थापितांविरुद्धचा संघर्ष अशी या सिनेमाची गोष्ट आहे. हा सिनेमा मागच्या वर्षी लाखो चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या