मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेता आहे. रितेशचे लाखो चाहते आहेत. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने त्याच्या एका लहानपणीच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रकाश इरेकर, माझा लहानपणीचा बाभळगाव, लातुर या माझ्या गावातला मित्र.
अनेक वर्ष ओलांडली आहेत पण आमची मैत्री ही तशीच आहे, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.दरम्यान, रितेश नेहमीच त्याची पत्नी जिनिलियाचे मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. रितेश बाघी ३ या चित्रपटात दिसला आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या