Header Ads Widget

महाडीबीटीवर अर्ज भरण्यासाठी मुदतीबाबत निवेदन

    अमरावती : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नविन अर्ज भरण्यासाठी 9 जानेवारी व नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी 4 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक समाजकल्याण आयुक्त माया केदार यांनी दिली.

    सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती , मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रम आणि संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजना आहेत.

    माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2021-22 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती या प्रवर्गातील नविन अर्ज भरण्याकरिता दिनांक 9 जानेवारी व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याकरिता दि.4 जानेवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात यावे. तसेच सन 2020-21 मधील विद्यार्थ्यांनी लॉगिनकडे त्रुटी पूर्ततेकरिता ‘ सेंड बॅक ’ केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयाची विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटिपूर्तता करून घ्यावी. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील, असे आवाहन श्रीमती केदार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या