Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

भाग्यश्रीची मुलगी सिनेमात येतेय

    मुंबई : सलमान खानसोबत मैने प्यार किया या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार्‍या भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दसानी आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. अवंतिका झी ५ वरील मिथ्या या वेबसीरिज मधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करीत आहे. या सीरिजमध्ये अवंतिका हुमा कुरेशीसोबत काम करताना आपल्याला दिसणार आहे. हुमासोबत तिचाही लीड रोल आहे. सीरिजचा फस्र्ट लूक पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे,ज्या पोस्टरवर हुमासोबत अवंतिकाही दिसत आहे.

    या वेब सीरिजचे दिग्दर्शन रोहन सिप्पी यांनी केले आहे तर निर्मिती अप्लॉज एंटरटेनमेंटची आहे. ही सीरिज ६ भागांची आहे. हुमा आणि अवंतिकासोबत या सीरिजमध्ये परमब्रत चटर्जी,रजित कपूर आणि समीर सोनी महत्त्वाच्या व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. यात हुमा हिंदी विषयाच्या प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अवंतिका तिची विद्यार्थीनी दाखविण्यात आली आहे. थ्रील आणि सस्पेन्सनी भारलेली ही सीरिज बर्‍याच अंशी क्लासरुम ड्रामा असल्याचे बोलले जात आहे. हुमा कुरेशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाचे पोस्टर शेअर करीत खूप इंट्रेस्टिंग कॅप्शन दिले आहे.

    मिथ्या ही २0१९ मध्ये आलेल्या इंग्लिश वेब सीरिज चीट चा रीमेक असल्याचे बोलले जात आहे. त्या सीरिजमध्ये केली, मौली विंडसर,टॉम गुडमैन-हिल यांच्या मुख्य भूमिका होत्या. अवंतिकाचे या सीरिजच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण होत असल्याने भाग्यश्रीची मुलगी म्हणूनही तिच्याकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. आईचा पहिलाच सिनेमा सुपरहिट होता,त्यातन आईही अनेक पारितोषिकांची मानकरी ठरलेली आता अवंतिका भाग्यश्रीच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वांच्या अपेक्षांना खरी उतरते का ते लवकरच कळेल. फक्त हुमा कुरेशीच्या अभिनयापुढे अवंतिकाही उजवी ठरो या शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code