Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

सामाजिक विकास योजनेतून होणार गावांचा विकास -आमदार देवेंद्र भुयार

    * मोर्शी वरुड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर !

    मोर्शी : वरुड मोर्शी तालुक्यात नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत” सन २०२१-२२ या वर्षासाठी असलेल्या अर्थसंकल्पीत तरतुदीतून या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" मधील जामगाव खडका, पुसला, जरूड, टेंभुरखेडा, राजुरा बाजार, अंबाडा, लोणी, गव्हांनकुड, बेनोडा, हिवरखेड येथील कामांना १ कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली असून सामाजिक विकास योजनेतून गावांचा विकास होणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

    मोर्शी वरुड तालुक्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सुचविलेल्या कामांना "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने" अंतर्गत सण २०२१ - २२ या वर्षासाठी मोर्शी वरुड तालुक्यातील विकास कामांना शासनस्तरावरून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची मागणी करण्यात आली होती.

    सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन सदर योजनेमध्ये घ्यावयाच्या कामांमध्ये वाढ करुन त्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींशी निगडीत स्थळे तसेच, सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टया महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे, त्यांची स्मारके उभारणे व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा सांस्कृतिक विकास घडवून आणणे करीता मोर्शी वरुड तालुक्यातील जामगाव खडका, पुसला, जरूड, टेंभुरखेडा, राजुरा बाजार, अंबाडा, लोणी, गव्हांनकुड, बेनोडा, हिवरखेड, येथे रस्ते पूल नाली स्मशानभूमी व दफनभूमी सौंदर्यीकरण पुतळा सौंदर्यीकरण शाळा दुरुस्ती वॉल कंपाऊंड सभागृह सौंदर्यीकरण करने करीता १० गावाकरीता १० लक्ष रुपये प्रमाणे १ कोटी रुपयांच्या विकास कामांना ४ आक्टोबर रोजी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code