Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मिथुनचा जावई हॉलीवूडचा स्टार

    मुंबई : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवणार्‍या अभिनेत्यांमध्ये मिथुन चक्रवर्तीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. सध्या त्याच्या मुलीच्या नावाची चर्चा आहे. तिचे नाव दिशानी चक्रवर्ती असे आहे. तिचा बॉयफ्रेंड हा हॉलीवूडचा अभिनेता आहे.

    त्याचे नाव कोडी सुलेक असे आहे. तिच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्तानं सोशल मीडियावर फोटो शेयर केले आहेत. यापूर्वी देखील तिने शेयर केलेल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली होती. मिथुन चक्रवर्तीची एकुलती एक मुलगी दिशानी चक्रवर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या प्रेमप्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने काही फोटो शेयर केले आहेत. आता जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामध्ये कोडी आणि दिशानी यांचा वेगळा लूक व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. मिथुनच्या मुलाकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही.

    ते फोटो शेयर करताना दिशानीने लिहिले आहे की, माझ्या आयुष्यात तु खुप काही आनंद घेऊन आला आहेस. हॅप्पी वन एयर..असे तिने म्हटले आहे. दिशानीने आपल्या पहिल्या अँनिव्हर्सरीच्या निमित्ताने एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच दिशानीने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केलेला नाही. यापूर्वी अनेकदा तिनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. कोडीने देखील दिशानीसाठी अनेक पोस्ट शेयर केल्या आहेत. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, तु माझ्या आयुष्यामध्ये खुप आनंद घेऊन आली आहेस. मी फार भाग्यवान आहे. मला तु भेटलीस. दिशानीने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केलेला नाही. यापूर्वी अनेकदा तिनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code