Header Ads Widget

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन

    पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सिंधुताई यांच्यावर पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. सिंधुताई यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर रुग्णालयाबाहेर गर्दी वाढताना दिसत आहे.

    सिंधुताई यांना त्यांच्या समाजकार्यासाठी गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र सरकारकडून त्यांना २0१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला होता. त्याआधी २0१0 साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशाप्रकारे सिंधुताई यांना जवळपास ७५0 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.सिंधूताई यांचे समाजकायार्ची जगभरात दखल घेतली गेलीय. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप खडतर प्रवास केला. सर्व खडतर प्रसंगांना तोंड देत त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. खरंतर सिंधुताई यांचा खडतर प्रवास हा त्यांच्या जन्मापासूनच सुरु झाला होता. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला होता. घराला कुलदीपक हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताई यांचं नाव चिंधी ठेवण्यात आले होते. गावा लहान असल्याने सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचं फक्त इयत्ता चौथीपयर्ंत शिक्षण झालं होतं. तसेच वयाच्या९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. अनेक संघर्षांना सामोरे जात त्यांनी हजारो अनाथ बालकांचे पालकत्व स्विकारले होते.

    सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्‍जवल भविष्याची जबाबदारी घेतली. त्यादिशेने त्यांनी अनेक वर्ष काम केले. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांचें पालकत्व निभावले. त्याचबरोबर त्यांनी अशा अनेक संस्थांमधून अनाथ बालकांची जबाबदारी खांद्यावर घेतली.त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना २0१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर २0२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या