Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

असे यावे वर्ष नवे

    काट्यांचेही गुलाब व्हावे
    फुल व्हावेत फुलपाखरु
    दु:खालाही अंकुर फुटावे
    त्याचे व्हावे उनाड वासरु
    क्लेशालाही यावीत फुले
    किल्मिषे ही गळून पडावी
    द्वेष अंहकार जावे विलया
    राग प्रेमे गळाभेट घडावी
    अन्यायाचे पंखच गळावे
    अत्याचारीचे मुळ सुकावे
    आनंदोत्सवी महिमा गाता
    थोरापुढे नम्रते शिर झुकावे
    झाडासम व्हावे परोपकारी
    बंधुता न्याय मानवता समता
    संपत्तीची सोडुनी हो लालसा
    सागरासम जन ह्दयी ममता
    शुलाचेही मोरपंख व्हावे
    दृष्टालाही यावी प्रेम कळी
    अश्रूही सातमजली हसे
    हुंदके व्हावे सुगंध कळी
    लालच होते छोटी पणती
    पाऊस येईल हर्षोधारा
    इवल्याशा दु:खालाही
    जगात कोठे नसेल थारा
    असे यावे नव वर्ष जगी
    दु:खीतांचे अश्रू पुसत
    आरोग्य लाभो सर्वजना
    जगा असे की,सारे हसत
    मुबारक उमराणी
    सांगली
    ९७६६०८१०९७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code