मुंबई : दीपिका पदुकोणचा ३६ वा वाढदिवस बुधवारी झाला. यानिमित्त तिने तिच्या चाहत्यांना गिफ्ट देताना तिचा आगामी चित्रपट 'गहराईयाँ'तील ६ पोस्टर्स सोशल मीडियातून शेअर केले. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत असून या पोस्टर्ससोबतच या चित्रपटाची रीलिज डेटही समोर आली आहे. पूर्वी हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रीलिज करण्याची तयारी होती. मात्र आता ११ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट अँमेझॉन प्राईम व्हिडीओवर रीलिज होत आहे.
शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा, रजत कपूर, नसिरूद्दीन शहा यांच्याही भूमिका आहेत. दीपिका आणि सिद्धांत यात बोल्ड भूमिकेत आहेत. आजच्या काळातील युवक, प्रेम, नात्यांतील गुंतागुंत या विषयावर हा चित्रपट आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या