Header Ads Widget

आर्वीतील रुग्णालय परिसरात चार तास खोदकाम

  * अवैध गर्भपात प्रकरण : सोनोग्राफी मशिनसह इतर साहित्यांची तपासणी

  वर्धा : अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बहुचर्चित भ्रूणहत्या प्रकरणाला तपासात वेगळे वळण येत असून, शुक्रवारी पोलिसांनी पुन्हा आर्वीतील कदम रुग्णालय परिसरात असलेल्या विहिरीत सुमारे चार तास खोदकाम सुरू केले.

  विहिरीतील खोदकामात काय सापडले, याबाबत अधिकार्‍यांनी गोपनीयता पाळली. मात्र, ब्लड सँपलसह काही साहित्य नेल्याची माहिती मिळाली आहे. वर्धा आणि नागपूर येथील फॉरेन्सिक विशेष पथकाने रुग्णालयातील सोनोग्राफी मशिनसह या परिसरातील भागाची पूर्ण पाहणीसुद्धा केली आहे. अधिक तपास करण्याकरिता येथील सोनोग्राफी मशिनसुद्धा जप्त करण्यात आली असून, यातील डाटा बेसच्या आधारे अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. याआधी रुग्णालय परिसरातील गॅस चेंबरमध्ये ११ कवट्या आणि ५४ हाडे सापडली होती . घटनास्थळी पोलिस, आरोग्य प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत. विहिरीत खोदकामाला सुरुवात केल्यानंतर मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. गेल्या चार तासांपासून अधिकार्‍यांच्या समक्ष मलबा बाहेर काढला जातोय.

  विशेष पथक रुग्णालयात दाखल होताच या परिसरात कुणालाही प्रवेश दिला गेला नाही. दरम्यान, पीसीपीएनडीटी समितीच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी रुग्णालय व घटनास्थळाची पाहणी करून जिल्हा आरोग्य यंत्रणासुद्धा दोषी असल्याचे सांगितले. आर्वी शहरात समोर आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात पीसीपीएनडीटी समितीच्या राज्य सदस्य डॉ . आशा मिरगे यांनी आर्वी येथे भेट दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील तथ्य पडताळून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मिळालेल्या कवट्या आणि हाडे एकूणच रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारे असल्याचे मत आशा मिरगे यांनी वर्धा येथे विर्शामगृह आयोजित पत्रकार परिषदेत मांडले.

  अधिकृत गर्भपात केंद्राची परवानगी १२ आठवड्यांची आहे. ज्या कवठय़ा मिळाल्या त्या १४ आठवड्यांच्या आहेत, त्यामुळे डॉक्टर गुन्हेगार आहे. कायद्यानुसार याप्रकरणी गुन्हेगार ठरत आहे . अल्पवयीन मुलगी २२ ते २३ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर येत आहे. याशिवाय अल्ट्रासाउंडची जी परवानगी आहे ती जानेवारी २0२१ मध्ये रद्द झाली आहे. मुदत संपली असतानादेखील अजूनही व्हिडीओ फोटो गॅलरी (सोनोग्राफी) केंद्र कसे सुरू? असा प्रश्न उपस्थित करून यामध्ये जिल्हा आरोग्य यंत्रणासुद्धा दोषी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शैक्षणिक धोरणासह लैंगिक शिक्षणाची गरज सामाजात लैंगिक शिक्षण हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी पालकांची देखील आणि शासन आणि केंद्र शासनाच्या जबाबदारी आहे. शैक्षणिक धोरणासह प्रत्यक्ष पाठय़पुस्तकात लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचेही डॉ. आशा मिरगे यांनी म्हटले आहे.

  महाराष्टात बीड येथील घडलेल्या प्रकरणाप्रमाणेच आर्वी येथील प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. शासकीय नियमाची तिलांजली देत, पैशांच्या लालसेपोटी आवीर्तील एक अल्पवयीन मुलीसोबत शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलाने जबरदस्ती शरीरसंबंधातून गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात डॉक्टर रेखा कदम यांनी केला. या प्रकरणी डॉक्टर महिलेसह चार लोकांना आर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन दिवसांच्या पोलिस कस्टडीनंतर आर्वी न्यायालयात हजर केले असता, आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली. या प्रकरणी आणखी काय सत्य पुढे येईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या