Header Ads Widget

माई

  अनाथांची माय
  अनंतात विलीन झाली
  लेकर तीची सारी
  उघड्यावर पडली !!
  चिंधी ची झाली सिंधू
  चौथा वर्ग शिक्षण घेतलं
  जगात मान सन्मान
  कर्तुत्व महान केलं !!
  मुर्ती लहान किर्ती महान
  अशी आमची सिंधुताई
  प्रत्येकाच्या हृदयाची
  झाली लाडकी माई !!
  किती यातना भोगल्या
  अपमान ही सहन केला
  जिद्द आणि आत्मविश्वासाने
  पद्मश्रीचा सन्मान मिळवला !!
  अशा आदर्श माईला
  कोटी कोटी प्रणाम
  सतत हृदयात स्थान
  तीला विनम्र सलाम !!
  हर्षा वाघमारे
  नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या