मुंबई : राज्यातील एकूण ३0 जिल्ह्यांतील ९३ नगरपंचायतीच्या निवडणुका मंगळवारी पार पडल्या. या निवडणुकीत एकूण ३३६ जागांसाठी निवडणूक झाली असून ७0 टक्क्यांवर मतदान झाल्याची माहिती आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या १0 जागांसाठी निवडणूक झाली.
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर मतदान झाले. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठीही मतदान झाले. १0५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. याशिवाय १९५ ग्रामपंचायतींमधील २0९ रिक्त जागांसाठीही मतदान झाले. याचा बुधवारी निकाल लागणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये ११ जागांसाठी मतदान पार पडले. सकाळी साडेसात वाजतापासून मतदानास सुरुवात झाली असून ११.३0 पयर्ंत ५३ टक्के मतदान पार पडले आहे.
जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा या नगरपंचायतीकरिता ११ जागांवर ५ हजार ७0६ मतदारांनी आपला हक्क आज बजावला. या भागात राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम, भाजपचे माजी राज्यमंत्री अम्बरिशराव आत्राम, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते दीपक आत्राम या तीन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या