Header Ads Widget

प्रियांका-निकने रोमँटिक अंदाजात केले नव्या वर्षाचे स्वागत

    मुंबई- बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकचे गायक निक जोनसशी लग्न केले आहे. प्रियांकाचे लाखो चाहते आहेत. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कार राहते. दरम्यान, आता निक जोनसने प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर करत नवीन वर्षाचे स्वागत कसे केले ते सांगितले आहे.

    निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निक आणि प्रियांका दिसत आहेत. प्रियांका निकला किस करत आहे. तर त्या दोघांनी पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हा फोटो शेअर करत माझी कायमची नवीन वर्षाची किस, असे कॅप्शन निकने दिले आहे. त्यांचा हा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

    प्रियांका आणि निकने २0१८ मध्ये जोधपुरमध्ये लग्न केले. प्रियांकाचा नवा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील तिच्या स्क्रिन टायमिंगवरून तिला अनेकांनी ट्रोल केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या