उमरखेड : अतिसंवेदनशिल शहर म्हणून गृह खात्याच्या दप्तरी नोंद असलेल्या उमरखेड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता नांदावी यासाठी आपल्या प्रदिर्घ कार्य काळात आपले कर्तव्य चोख बजावून शहरातील तसेच गाव गाड्यातील सर्वधर्मीय , राजकिय व सामाजिक क्षेत्रातील तसेच सर्व सामान्य नागरिकांशी सुसंवाद साधून जिल्हा विशेष शाखेमध्ये गोपनिय पोलिस म्हणून कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी दीपक कांबळे यांची सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक म्हणून नुकतिच पदोन्नती झाली. त्यांच्या कार्य काळाचा आढावा घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी त्यांचे बॅच लाऊन स्वागत केले आहे.
पुसद तालुक्यातील आरेगाव हे त्यांचे मुळगाव असून सन १९९१ ला पोलिस दलात कार्यरत झाल्यानंतर त्यांनी दारव्हा, वडगाव रोड (यवतमाळ ) .पुसद ग्रामिण, महागाव, अशा विविध ठिकाणी आपले कर्तव्य बजावले आहे. २0१८ मध्ये त्यांना प्रथम पदोन्नती , सन २0११ मध्ये व्दितीय मिळाल्यानंतर सन २0२२ मध्ये तिसरी पदोन्नती त्यांना पोलिस विभागाकडून प्राप्त झाली. यवतमाळ जिल्हा विशेष शाखेत कार्यरत राहुन जातीय सलोखा कायम राहावा यासाठी त्यांनी पर्शिम घेतले आहे. त्यांचा सर्वाधिक कार्यकाळ उमरखेड पोलिस स्टेशनला राहिला आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या