Header Ads Widget

एसटी कर्मचारी आंदोलनाला कोरोनाचा फटका

    मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. राज्यात काल ८ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत साडे पाच हजाराच्या घरात रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोरोना प्रादुभार्वाचा फटका आता एसटी कर्मचार्‍यांना बसतोय. आझाद मैदानावर मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार या कर्मचार्‍यांना ठराविक वेळेसाठी आझाद मैदान सोडावे लागणार आहे.

    दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांचा दुखवटा सुरुच राहणार असल्याचे या कर्मचार्‍यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सरकारच्या नियमावलीनुसार आम्ही संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पयर्ंत आझाद मैदानातू बाहेर पडणार आहोत. मात्र, पहाटे ५ वाजता आम्ही पुन्हा एकदा आझाद मैदानावर दुखवटा पाळणार असल्याचे एसटी कर्मचार्‍यांनी म्हटले. अँड. गुणर% सदावर्ते यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतल्याचं या कर्मचार्‍यांनी सांगितले. तसंच आमची बाहेर राहण्याची आणि खाण्याची सोय झाल्याचंही कर्मचारी म्हणाले. दुसरीकडे राज्यात विविध आगारात पाळला जाणारा दुखवटा सुरुच राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या पगारवाढीची घोषणा केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदान सोडलं. त्यानंतर अजय गुजर प्रणित संघटनेनंही आंदोलनातून माघार घेतली. मात्र, तरीही एसटी कर्मचार्‍यांनी आझाद मैदान सोडलं नाही. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे एसटी कर्मचार्‍यांना आझाद मैदान सोडावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या