Recent in Technology

Advertisement

Breaking News

तुझ्या पाठीमागे

    होते खळकाळ शेत
    थोडी माती काळीभोर
    कसे पेललेस बाबा
    रित्या पाण्याचे अंबर
    नाही पाण्याचा ओलावा
    शेत होते कुपोषित
    कशी जगली माणसे
    गांवकुसाच्या मातीत
    भूक पोटभर होती
    ओठ कोरडे पडले
    किती वेदनेचे घाव
    पाण्यासाठी झेललेले
    पाण्या-पावसात वस्ती
    रडे दुपारच्या वेळी
    कष्ट उपसत होती
    माणसं साधी आणि भोळी
    तरी मिळेना भाकर
    आणि पाणीही ओठाले
    किती राबावे मातीत
    सारे आयुष्य फाटले
    नाही तन मन धन
    लाचारीचं होतं जीणं
    फाटलेल्या आयुष्याला
    गाठी-दो-याची शिवण
    खत बियाणे पेरूण
    शब्द-शब्द उगवले
    तुझ्या जागलीने बाबा
    शेत तरारून आले
    तुझा शब्द झाला घास
    कुस टच्च भरलेली
    तुझ्या पाठीमागे बाबा
    रान-वस्ती विखुरली....
    =अर्जुन मेश्राम,
    लोक विद्यालय, गांगलवाडी
    ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर ४४१२०६
    ९६०४०१३६६७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code