- पिंपळखुटा/स्वाती इंगळे
भिली येथे २५ डीसे. ला एक दिवसीय शिबीर संपन्न झाले.देशी बियाणे बीज बँक निर्माते श्री रमेशराव साखरकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादासजी जोशी, माजी न्यायाधीश,आणि गोव्याचे लोकायुक्त हे होते,प्रमुख पाहुणे डॉ.उमप वैद्यकीय अधिकारी चांदुर रेल्वे, पवनजी मिश्रा वाशिम,प्रमोदजी किमोटी,डेहराडून, डॉ.प्रीती वीरकर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साखरकर गुरुजी यांनी केले त्यांनी यामध्ये जर मातीला आणि शरीरराला जपायचे असेल तर विषमुक भाजीपाला कडधान्य आहारात आवश्यक आहे,गेल्या ३२ वर्षापासून सतत मी प्राकृतिक शेती करत असून अनेक साथी यातून तयार झाले,म्हणून प्रत्येकाने आपल्या घरी देशी बियाण्याची परसबाग तयार करून स्वास्थ जपल पाहिजे.आज या काळात २७३ प्रकारचे देशी बी मी जपले.आपण सर्वांच्या सहकार्याने. यामधे सातत्य महत्त्वाचे आहे.या कार्यक्रमामध्ये प्रयोगशिल शेतकऱ्यांचे मनोगत आणि मार्गदर्शन झाले.
यामधे निरंजन रोंघे विरुल,दीलीपजी राऊत,प्रफुल सावंत शिडोडी हे होते.भाजीपाला व कडधान्य प्रदर्षणी मध्ये लाल माठ,पालक, सांभार,शेवगा,लसूण,कांदा,हळद,आले, काळी हळद, शहानूर तूर हे देशी पिके होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशी सर यांनी मार्गदर्शन करतांना भारत भूमी ही कृषिप्रधान आहे. स्वयंभू आहे जीवन शिक्षण यात आहे,हे सर्व पाहून इंग्रज अवाक झाले. आणि ही परंपरा संपण्यासाठी नाहीशी करण्यासाठी मेकॉले यांनी शिक्षण पद्धत आणली की जी पद्धत फक्त नोकरवर्ग तयार करेल.
ते यामधे यशस्वी झाले.आपल्याला परत भारतीय विषमुक्त शेती परंपरा आणि चिकिस्ता करून शेतीत उतरले पाहिजे तरच शेती टिकेल.अन्यथा सर्वनाश अटळ आहे.आपली प्रतिकार शक्ती का कमी झाली कारण आपली माती बिमार झाली.म्हणून पुन्हा सुजलाम - सुफलाम - निरोगी वातावरण तयार करायचे असेल तर या दिशेने वाटचाल व्हायला पाहिजे.या कार्यक्रमात आश्विनजी सव्वालाखे,राजेश झुटी,सचिन निस्ताने, गजाननराव ठाकरे,सुरेशजी निखाडे,प्रमोदजी किमोठी,प्रीती वीरकर हे उपस्थित होते तर जवळपास ५५ प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन डॉ.नागपुरे सर प्रो. आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार भूषण दुवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस लांजेवार,आदर्श बरवट,रोशन वरठी यांनी केले.
0 टिप्पण्या