अमरावती : पत्रकारिता हि पैसा कमावण्याचा, नफा कमावण्याचा धंदा नसून माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत आहे. पत्रकारांनी लोकशिक्षण करतना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन, निष्पक्ष राहून वेगवेगळ्या बाजू सांगत सत्याची मांडणी करणं अपेक्षित असल्याचं झी २४ तास वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी बीइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस् अमरावती येथे आयोजित विशष चर्चासत्राच्या वेळी सांगितले.
अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित बीइंग आर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस् अमरावती येथे अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून न्यूज बुलेटन विषयावर प्रात्यक्षिकासह चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून झी २४ तास वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आणि कॅमेरामॅन सागर तायडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच संस्था अध्यक्ष पंकज धंदर , संचालक स्नेहा वासनिक, तांत्रिक प्रशिक्षक प्रविणसिंग तोवर यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम जिल्हा प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रात आलेला अनुभव सांगत फोटोग्राफर ते नामांकित झी २४ तास वृत्तवाहिनीचा जिल्ह्या प्रतिनिधी बनण्यापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. पुढे ते म्हणाले कि, राज्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणं, प्रचार न करता वस्तुस्थिती समोर आणणे, प्रतिमांच्या मेकअपचे थर पुसत खरा चेहरा समोर आणणे, धारणा व वास्तव यांची गल्लत करण्याचा खेळ मोडत,आवश्यक नसणाऱ्या प्रश्नांच्याखाली दाबण्यात आलेले खरे प्रश्न ऐरणीवर आणणे, सर्व स्तरांवरच्या आणि सर्व प्रकारच्या बुवाबाजीचा पडदा फाडणं, आव्हान देणं आणि सतत प्रश्न विचारणं हेच पत्रकारितेचं काम आहे. प्रश्न विचारण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवायचा असेल तर सर्व प्रकारचे लाभ, प्रलोभने, कृपादृष्टी, लाभाची पदे या सगळ्यांपासून चार हात लांब राहायला पाहिजे. ही विचारसरणी आदर्शवादी वाटत असली तरी व्यवहारात उतरवणं शक्य असल्याच जिल्हा प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यानी यावेळी पटवून दिले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या पत्रकारिता क्षेत्राशी निगळीत प्रश्नांची विस्तृत उत्तरे देत प्रत्यक्ष बातमी कशी करायची वृत्तवाहिनीवर बातमीचे साइन इन आणि साइन उप कसे करायचे, बातमी वृत्तवाहिनीवर देत असतांना PTC, WKT, फोनो, कसा करायचा, तसेच चौपाल म्हणजे काय? बातमी सांगायची लिहण्याची पद्धत, वृत्तवाहिनीवरील पत्रकारितेमधील आवश्यक शब्द सांगत वेगवेगळ्या बीटच्या बातम्या कश्या पद्धतीने करायच्या याचे विस्तृत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
शेवटी संस्था अध्यक्ष पंकज धंदर यांनी झी टीव्ही तसेच झी २४ तास वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आणि कॅमेरामॅन सागर तायडे यांचे आभार मानले तसेच बीइंग आर्टिस्ट अकॅडेमी तर्फे नागेश रंगारी, मयूर चौधरी, कुणाल मानकर, भागेश्री गाढवकर, सुराजसिंग चौहान, हर्षल कुर्हाडे, आकाश पांडे,यांनी पुष्पगुच्छ देऊन चर्चासत्राचा समारोप केला.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या