Header Ads Widget

परीचे गिफ्ट, शेफालीचे सरप्राईज, यशच्या हटके शुभेच्छा

    मुंबई : हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखले जाते. सध्या प्रार्थना ही झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. प्रार्थनाने नुकतंच बुधवारी ५ जानेवारीला तिचा ३९ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त सेटवर वेगवेगळ्या पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचे अनेक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

    माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील कलाकारांनी प्रार्थनाचा वाढदिवस खास बनवत तिला अनेक गिफ्ट्स दिले आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या मालिकेत शेफालीची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री काजल काटे हिने तिला खास सरप्राईज दिले. शेफालीने तिचा रुम छान फुग्यांनी डेकोरेट केला होता. त्यासोबत तिने एक केक मागवत तिचा वाढदिवस साजरा केला.

    तर दुसरीकडे छोट्या परीनेही प्रार्थनाला छान गिफ्ट दिले. याचा एक छानसा व्हिडीओही प्रार्थनाने शेअर केला आहे. यात ती परीला तूच गिफ्ट उघड असे सांगताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर अभिनेता श्रेयस तळपदेनेही तिला हटके पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना त्याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यात श्रेयस तळपदे हा हॅप्पी बर्थडे असे गाणं गात येताना दिसत आहे. यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तो नेहा कामत उर्फ परीची आई, असे पटकन प्रार्थनाला म्हणतो. यादरम्यान प्रार्थना मात्र त्याच्याकडे रागात पाहात असल्याचे दिसत आहे.दरम्यान सध्या माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका एका वेगळ्याच वळणावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या