Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी केली 'फिशरीज हब'ची पाहणीं

    अमरावती : महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी आज फिशरीज हब ची पाहणी केली. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिशरीज हब ची उभारणी करुन निलक्रांती योजने अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे कोळी लोक, मत्स्य उत्पादक, अमरावती महानगर पालिका क्षेत्रालगत विक्रेते तथा ग्राहक यांना फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी निधी उपलब्ध करुन दिलेला आहे.

    हा प्रकल्प महानगरपालिका राबवित असून या प्रकल्पाची किंमत रु.२१.८२ कोटी आहे. ताज्या, थंड आणि गोठलेल्या आणि मुल्यवर्धीत माशांच्या खाद्य उत्पादनांचे व्यापार, गोदाम, प्रक्रिया, वितरण आणि निर्यात यासाठी अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसाय हब (फिश फूड हब) मध्ये रुपांतरीत होणार आहे.आयुक्तांनी यावेळी अधिका-यांना सांगितले की, फिशरीज हब तयार करुन सर्व आवश्यक सुविधा देवून सुविधा पुरविण्यासाठी कार्य करावे. ग्राहकांना दजेर्दार मासे उपलब्धता सुनिश्‍चित करावी.v

      गुणवत्ता नियंत्रण उपकरणे आणि आवश्यकते सह फिशरीज हब प्रदान करावा. स्थानिक फिशर किंवा मासेंच्या शेतक-यांना आवश्यक असलेल्या सर्व गरजा, सुविधा आणि आधारभुत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. महिलांना सशक्त करणारे ग्रामीण भागात नोकरीची संधी निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. खास करुन वाहतूक आणि विपणन क्षेत्रामध्ये स्वयंम रोजगार संधी निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. मत्स्य उत्पादकांना थंड मच्छीचे बाजारपेठ तयार करण्यासाठी आणि आइस्ड आणि गोठलेल्या मासेंच्या उत्पादनासाठी तयार होण्यासाठी मोबाईल व्हेंडींग वाहने, इंटीग्रेटेड मोबाईल फिश व्हेंटीन्सची निर्मिती करण्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. पोस्टहार्वेस्ट सुविधा जसे की आईस्कड फिश, प्रीप्रोसेंसिंग, फिश ड्रेसिंग आणि मूल्यवर्धित उत्पादनांचे आणि त्यानुरुप उत्पादकांसाठी आणि ग्राहकांना गुणवत्ता उत्पादनांची पूर्तता या प्रकल्पातून होणार आहे. सदर प्रकल्प गतीमान करुन दजेर्दार करावा अश्या सुचना यावेळी दिल्या.मौजे बडनेरा, कोंडेश्‍वर रोड येथे फिशरीज हब उभारण्याचे कार्य सुरु असून या ठिकाणी होलसेल व रिटेल फिश मार्केट तयार होत आहे.

      या ठिकाणी फिश ड्रेसिंग सेंटर, आईस प्लांन्ट, होलसेल शॉप ३0, रिटेल शॉप १0, चिल्ड रुम, आईस रुम तयार करण्याचे काम झाले आहे. मेकॅनिकल कामाची निविदा लावण्यात आली आहे. विद्युत कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे. शुक्रवार बाजार, चपराशीपुरा येथे अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्याचे कार्य सुरु आहे. या ठिकाणी ३६ होलसेल शॉप, १६0 रिटेल शॉप, चिल्ड रुम, आईस रुम तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. सोमवार बाजार येथेही अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्याचे कार्य करण्यात येत आहे. यामध्ये ४0 रिटेल शॉप तयार करण्यात येणार आहे. सदर तिन्ही ठिकाणी आयुक्तांनी पाहणी केली यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code