Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

लग्नानंतर वडील आईला सोडून गेले, लोक टोमणे मारायचे - तेजस्वी प्रकाश

    मुंबई : बिग बॉस १५ मध्ये तेजस्वी प्रकाशने मोठा प्रवास केला आहे. तिचं पूर्ण लक्ष आता बिग बॉसच्या ट्रॉफीकडे आहे. त्याचबरोबर, ती घरात करण कुंद्रासोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेते देखील आहे. तेजस्वी प्रकाशने आपल्या साथीदारांसोबत बोलताना फॅमिली स्ट्रगल्सविषयी सांगितले. तिने सांगितले की, जेव्हा तिचे वडील न सांगता निघून गेले होते. तिच्या आईपासून दीड वर्षे दूर होते. लग्नाच्या एक आठवड्यानंतरचे ते आईला सोडून निघून गेले होते.

    वडिलांनी आईला धोका दिला होता?

    ती म्हणाली-जेव्हा माझ्या आई-वडिलांचे लग्न झाले होते. तेव्हा आठवडाभरानंतर माझे वडील दुबईला निघून गेले होते. त्यांचं अरेंज्ड मॅरेज होते. ते दीड वर्ष परत आले नाहीत. सर्व जण आईला म्हणायचे की ते धोका देऊन पळून गला. आता तो येणार नाही. लग्न करू? पळऊन गेलाय तो. पण, वडील आणि आई एकमेकांना प्रेमपत्र लिहायचे. ते फोनवरून बोलण्यासाठी फोन बूथवर जाण्याचे प्लॅनिंग करायचे. किती कठीण होते यार.

    दीड वर्षे तिच्या वडिलांनी काय केले? यावर ती पुढे म्हणाली की, त्यांनी दुबईत सेटल होण्यासाठी इतके वर्षे घालवले. मोठं घर खरेदी केले. महागडी कार खरेदी केली. अन्य साहित्य खरेदी केले. त्यानंतर आईला दुबईला बोलावले. आधी लोक नाराज होते. तर सर्वजण खूश झाले. तिने पुढे सांगितले की काही काळासाठी तिला दुबईत राहावे लागले होते. ती यूएईचीही रेसिडेंट असायची.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code