Header Ads Widget

दरवर्षी २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा होणार

    नवी दिल्ली : साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या वषार्पासून २६ डिसेंबर हा दिवस ह्यवीर बाल दिवस म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पूर्वचे पवित्र औचित्य साधून केली आहे.

    ट्विटसच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले, आज, श्रीगुरु गोविंद सिंगजींच्या प्रकाश पूरबच्या पवित्र दिवसानिमित्त, मला हे सांगताना गौरव वाटत आहे की या वर्षापासून, २६डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस पाळला जाईल. साहिबजादेंच्या न्यायासाठीच्या लढय़ाला आणि धैयाज्ञाल ही सर्मपक र्शद्धांजली आहे.

    साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांना भिंतीत जिवंत बंद करण्यात आल्यामुळे ज्या दिवशी हौतात्म्य प्राप्त झाले त्याच दिवशी ह्यवीर बाल दिवस असेल. या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्त्वांपासून विचलित होण्याऐवजी मृत्यूला प्राधान्य दिले.

    माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सलोखा असलेल्या जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती कळणे ही काळाची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या