चांदूर बाजार : स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना, स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र, नेहरू युवा केंद्र, अमरावती (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय ) व आरोग्य विभाग, चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय युवा सप्ताह 'च्या निमित्य स्वामी विवेकांनद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सवासह "आझादी के 75 वर्षपर युवाओं का राष्ट्र निर्माण के लिए सहभाग " या विषयावर व्याख्यान, पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या ' 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात ' विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सहभाग तसेच आरोग्य विभागाच्या वतीने कोविड 19 लसीकरणाचे आयोजन आणि नेहरू युवा केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ , राजेंद्र रामटेके होते तर प्रमुख वक्ता कु. स्नेहल बासुतकर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, अमरावती, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. नंदकिशोर गव्हाळे, आयक्यूएसी समन्वयक आणि डॉ. शुभ्रांशू गायगोले, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रा. डॉ मंगेश अडगोकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र वर्षभर युवकांना प्रेरित करण्याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते. तसेच कु. स्नेहल बासुतकर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, अमरावती यांच्या सहकार्याने महाविद्यालयात ' राष्ट्रीय युवा सप्ताह 'च्या प्रथम दिवशी स्वामी विवेकांनद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्य व्याख्यानाचे आयोजन आणि विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करून कोरोनाच्या विरोधात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली .तसेच या लढाईला बळकटी देण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात आला आहे असे मत व्यक्त केले. यांनतर प्रमुख अतिथी कु. स्नेहल बासुतकर यांनी नेहरू युवा केंद्र भारत सरकारच्या युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय अंतर्गत काम करत असून समाजामधील तरुणांचा सहभाग घेत विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे तसेच जनजागृती करण्याचे काम करत असते. नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नियमित सहभागी होण्याचे आणि टोम्पे महाविद्यालयासोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्याची मनीषा व्यक्त केली. यानंतर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. नंदकिशोर गव्हाळे, समन्वयक, आयक्यूएसी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वामी विवेकानंदाचे कार्य जगातील मानव जातीला विश्वबंधुत्वाची शिकवण देत असून भारतीय युवकांना प्रेरणा देण्याकरिता त्यांनी आपल्या अल्प आयुष्यात महान कार्य केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी स्वामी विवेकांनद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती साजरी करतांना स्वामीजींनी तरुणांनी राष्ट्र निर्माण करण्याची भावना तरुणांमध्ये जागृत केली. तर दुसऱ्या राजमताने छत्रपती शिवाजी महाराजा सारख्या महान राज्याला घडवण्याचे महान कार्य केले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या कार्याची उजळणी करून उत्कृष्ट कार्य करण्यास प्रेरित व्हावे ; असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमाच्या शेवटी लसीकरणादरम्यान सर्व विद्यार्थ्यांना , उपस्थित नागरिकांना तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना कु. स्नेहल बासुतकर, प्राचार्य डॉ . राजेंद्र रामटेके आणि मान्यवराच्या हस्ते मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात आरोग्य विभागाच्या डॉ . शुभ्रांशू गायगोले, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वात श्री. अशोक जावरे, श्री .एम. वाय. पुडके, पी .एम .खेडकर, जया वानखडे, आशा वानखडे, जया लोखंडे, अर्चना यादव प्रामुख्याने लसीकरणास यांनी मदत केली.तसेच एकूण 125 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असून त्यामध्ये जुनिअर महाविद्यालयाचे एकूण 15 ते 18 वर्षाच्या दरम्यान एकूण 92 चे प्रथम लसीकरण तर 33 विद्यार्थ्यांचे द्वितीय लसीकरण करण्यात आले. लसीकरणास संस्थेचे सचिव श्री. भास्करदादा टोम्पे आणि प्रा. डॉ विजय टोम्पे यांनी भेट देत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पुन्हा लसीकरण आयोजनाची आवश्यकता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रियदर्शनी देशमुख, समन्वयक, स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र यांनी उत्कृष्टरित्या केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ. मंगेश अडगोकर, रासेयो, कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ प्रशांत सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनकरिता प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, रासेयो, महिला कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. प्रविण इंगळे, श्री. नितीन तसरे, प्रा. प्रणित देशमुख, प्रा. रवी निराळे, प्रा.पूनम सरदार, प्रतिक्षा आवारे, श्रद्धा निंभोंरकर, ओम भाविक, हर्षल ओकते, शुभम तायडे, श्री. विशाल भटकर तसेच रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या