Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना भीषण आग

    नंदुरबार : गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आज, शनिवारी आग लागली. नंदुरबार रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर ही घटना घडली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

    यासंदर्भात रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने जाणारी ही एक्स्प्रेस नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर गाडी असताना गाडीमधील पॅन्ट्रीच्या डब्यात आग लागली. आग लागल्याचे समजताच ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशी गाडीतून बाहेर पडले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोट पसरल्याने काही प्रवाशांना तर श्‍वास घेण्यासही त्रास झाला. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. त्यामुळे मोटरमनने एक्सप्रेस थांबवली.

    अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली. घटनास्थळी नंदुरबार अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दोन्ही डब्यांच्या कुलिंगचे काम करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code