Header Ads Widget

राज्यात वादळी पाऊस व गारपीटचा इशारा

    मुंबई : राज्यात ८ ते १0 जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता आहे. या तीन दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वापसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

    वातावरणात सध्या गारवा असला तरी राज्यातील काही भागात याची तीव्रता कमी-जास्त आहे. काही भागात तर ढगाळ वातवारण दिसत असून हवामानामध्ये बदल झालेला दिसतोय. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसा राज्यात १0 जानेवारीपर्यत पुन्हा पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात काही भागात विजांच्या कडकडाटास पाऊस तर दुसरीकडे रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

    राज्यात १0 जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता आहे. या तीन दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसू शकतो. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात ८ जानेवारीपासून वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात ८ ते १0 जानेवारी या कालावधीत बहुतांश भागात पाऊस बरसणार आहे. ८ आणि ९ जानेवारीला तुरळक भागात गारांचा पाऊस कोसळू शकतो. पुणे हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या