Recent in Technology

Advertisement

Breaking News

महाबँकेच्या एकरकमी योजनेतून थकित शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा

अमरावती : बँक ऑफ महाराष्ट्रच्या माहुली जाहगीर श्याखेने कृषी एनपीए खात्यांसाठी ११ जनवरी २०२२ ला माहुली जाहगीर येथे शिबीर आयोजित केले होते आणि शेतकऱ्यांना बँकेच्या कृषी विशेष ओटीएस योजनेबद्दल शिक्षित केले आहे.  ही योजना कृषी सवलतीच्या एनपीए कर्जदारांना आकर्षक सवलतीत खाते सेटल केल्यानंतर नवीन वित्त देऊ करत आहे.  बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर श्री .राहुल सी वाघमारे , कार्यालय वसुली विभागाचे मुख्य व्यवस्थापक श्री .मयूर मालू आणि माहुली जाहगीर शाखा व्यवस्थापक श्री .राजेश परदेशी यांनी संयुक्तपणे सर्व शेतकऱ्यांना या शेती विशेष OTS चा त्वरित लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

 ही योजना कृषी ग्राहकांना नवीन कृषी वित्त प्रदान करत आहे, ज्यामध्ये खात्यांना ३१.०३.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी NPA म्हणून चिन्हांकित केले गेले आहे व ज्यात एकूण NPA शिल्लक रू. १0,00,000/- आहे . योजना संपूर्ण व्याज माफीसह मुदल मन्धे काही सूट देत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रत्येक शाखेत लाभार्थ्यांची यादी उपलब्ध आहे.  ही योजना १५ .0२. २०२२ पर्यंत उपलब्ध आहे.

 योजनेची वैधता मर्यादित असल्याने, बँक ग्राहकांना विनंती करत आहे की त्यांनी त्यांच्या शाखांशी संपर्क साधावा आणि या कृषी विशेष ओटीएस योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून नवीन वित्त त्वरित मिळेल.  अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील या विशेष ओटीएस योजनेअंतर्गत बँकांनी आधीच ६५00 पेक्षा जास्त ग्राहकांना नवीन वित्तपुरवठा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code