Recent in Technology

Advertisement

Breaking News

नागार्जुनच्या द घोस्ट चित्रपटातून जॅकलिन फर्नांडिस बाहेर

    मुंबई : सातत्याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. या चर्चा २00 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या कथित संबंधामुळे रंगल्या आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर काही दिवसापुर्वी जॅकलिनचे इंटिमेट फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर जॅकलिने मीडियाला तिचे वैयक्तिक फोटो व्हायरल करू नका, असे आवाहन केले. जॅकलिनने ही पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर केली होती. अलीकडेच अशा बातम्या येत होत्या की जॅकलिन नागार्जुन अक्किनेनीच्या ह्यद घोस्ट चित्रपटातून बाहेर पडली आहे. तसेच जॅकलिन या चित्रपटाचा भाग का नाही असे विविध अंदाज प्रत्येकजण वर्तवत आहेत.

    याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी या प्रोजेक्टबद्दल जॅकलिन बोलत होती. पण निर्मात्यांना चित्रपटासाठी आकारले जाणारे शुल्क परवडणारे नसल्यामुळे त्यांनी यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच हा प्रकार घडला होता. निमार्ता आणि जॅकलिन दोघांनीही शांतपणे त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टवर जाण्याचा निर्णय घेतला. आता नागार्जुनच्या या चित्रपटात कोणती हिरोईन असणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याचवेळी, निर्मात्यांनी सांगितले की त्यांनी या चित्रपटाचे परदेशात शूटिंग करण्याची योजना आखली होती. पण कोरोनामुळे अद्याप तसे झालेले नाही. द घोस्ट हा एक अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

    द घोस्ट या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसपूर्वी काजल अग्रवालला कास्ट करण्यात आले होते. पण काजल गरोदर असल्यामुळे तिने चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर निर्मात्यांनी जॅकलिनची निवड केली होती. पण आता तिला देखील चित्रपटातून काढण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code