Header Ads Widget

प्रियांकाने अमेरिकेत मोलकरणीसोबत केली देवाची आरती

    मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाचे लाखो चाहते आहेत. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. बर्‍याचवेळा प्रियांकाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    प्रियांकाचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ तिच्या फॅनक्लबने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओत प्रियांकाच्या घरी असलेल्या दिवाळी पूजेचा आहे. पण या व्हिडीओत प्रियांका दिवाळीची पूजा ही पती निकसोबत नाही तर तिच्या मोलकरणीसोबत करत आहे. प्रियांकाने तिच्या घरात असलेल्या पूजेत फक्त कुटुंबाला नाही तर मोलकरणीला देखील सामिल केले. त्यामुळे तिचे कौतुक केले जात आहे.

    दरम्यान, प्रियांकाने या पूजेतले काही फोटो दिवाळीत शेअर केले होते. प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती पती निक जोनससोबत पूजा करताना दिसत आहे. या व्हिडीओत प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे तर निकने पांढर्‍या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. प्रियांकाचा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटातील तिच्या स्क्रिन टायमिंगवरून तिला अनेकांनी ट्रोल केले आहे. प्रियांका लवकरच जी ले जरा या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या