Recent in Technology

Advertisement

Breaking News

राज्याची तिसर्‍या लाटेकडे वाटचाल

    जालना : राज्यात ३६ हजार कोरोना रुग्णांचा टप्पा पार झाला असून आपण आता हळूहळू तिसर्‍या लाटेकडे वाटचाल करत असून तूर्तास लॉकडाऊन नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहन केले आहे. तसेच, रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांनी धोक्याचा इशारादेखील दिला आहे. ते जालन्यात बोलत होते.

    आता लागू केलेल्या निर्बंधाचे पालन करणे गरजेचे असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय निर्बंध कडक करावे लागतील, असा ईशारा देखील टोपे यांनी दिला आहे. मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकार्‍यांना दिले जातील. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही त्यावेळेत निबर्ंध आणता येईल का याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. मात्र, भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असा इशारा टोपे यांनी दिला आहे.

    देशात कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला असून ८ दिवसांत १ लाख १७ हजार रुग्ण आढळून आले आहेत. यासाठी गर्दी टाळली पाहिजे तरच संसर्ग कमी होईल, असंही त्यांनी म्हटले आहे. चित्रपट, नाट्यगृह,मंदिरं याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा लगेचच प्रस्ताव नसून गरज पडली तर निबर्ंध लावले जातील. मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे, टोपे यांनी सांगितले. अनेक जिल्हय़ात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या ठिकणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे तो निर्णय घेण्यात आल्याचे देखील टोपे म्हणाले.

    धारावीमध्ये १ हजार रुपयात लस घेतलयाच प्रमाणपत्र देणारी टोळी पकडली त्यांच्यावर सरकारकडून सक्त कारवाई केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाल्याचे टोपे यांनी मान्य केले असून चर्चा होत असतात मात्र अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात, असंही टोपे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव जात असतात त्यांच्याकडे गेलेला प्रस्ताव मान्य झाल्यासच अधिसूचना काढल्या जातात असेही त्यांनी सांगितले.

      दरम्यान राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून १0 तारखेनंतर बुस्टर डोस घ्यावा या महामारीतून नागरिकांना फक्त लस वाचवेल, असं अवाहन त्यांनी केले आहे. लसीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून पूर्वीपेक्षा कमी रुग्ण संख्या आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code