वरुड : शेंदुरजनाघाट मलकापुर येथील सन 1991 च्या मोवाड पुरग्रस्त झालेल्या पुनर्वसन भागातील नागरिकांना स्वतःचे मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शेंदुरजनाघाट येथील संदीप खडसे यांनी दिनांक 23 डिसेंबर पासुन केलेल्या जल व अन्नत्याग उपोषण आंदोलनाची दखल घेऊन आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रशासकीय यंत्रणा यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यामुळे शेंदुरजनाघाट मलकापुर येथील 135 पात्र लाभार्थ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले.
सन १९९१ च्या महापुरात वाहून गेलेल्या घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील १० वर्षाच्या काळामध्ये सुटू न शकल्यामुळे शेदूरजनाघाट, मलकापूर येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासन दरबारी बैठका घेऊन शेंदुरजनाघाट मलकापुर येथील 135 पात्र पूरग्रस्त लाभार्थ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मालकी हक्काचे पट्टे मिळाल्यामुळे पूरग्रस्त लाभार्थ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार, तहसीलदार मालठाने, मंडळ अधिकारी भेले, तलाठी चकुले, गावंडे, नगरसेवक भूपेंद्र कुवारे, अरुण डोईजोड, संजय डफरे, संदीप खडसे, शुभम श्रीराव, रवि वंजारी, गौरव गणोरकर, सतिश काळे, अनिल आंडे, लुकेश वंजारी, संजय थेटे, विक्की जयस्वाल, देवानंद जोगेकर, संजय वंजारी,अजय सरोदे, आनंदराव देशमुख, जीवन वंजारी, रावसाहेब वानखडे, नावेद शेख, नामदेव कळंबे, जगदीश लोखंडे, गुणवंत सोनारे, शुभम वडस्कर, हर्षल गोहत्रे, कपिल तिडके, दीपक घोरपडे, बंडु लांडगे, खडसे सर, राजू वरुडकर, वैभव फुके, अनिसभाई, निलेश पाटील, शुभम बाबारावजी आखरे, निलेश वऱ्होकर, उत्तमराव कुबडे, नानाभाऊ नवरंग, प्रफुल्ल तडस तसेच पात्र लाभार्थी आणि सहकारी नागरिक उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या