Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

भंगारातील एम ८0 आणि रिक्षाचे पार्ट्स वापरून बनवली फोर्डची डुप्लिकेट

    सांगली : गेल्याच महिन्यात सांगली जिल्हय़ातील देवराष्ट्रे गावात दत्ता लोहार यांनी भंगारातील साहित्यातून मिनी जिप्सी बनवली होती. आता सांगलीतील अशोक आवटी या तरुणाने तयार केलेल्या फोर्ड गाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. आवटी यांनी जुनी एमएटी गाडी आणि रिक्षाचे साहित्य वापरून १९३0 सालच्या फोर्ड गाडीची डुप्लिकेट तयार केली आहे. अवघे तीस हजार रुपये खर्च करून तयार केलेल्या गाडीने फोर्ड कंपनीच्या जुन्या गाडीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

    सांगलीताल कर्नाळ रोडवर राहणारे अशोक आवटी यांचे सातवीपयर्ंत शिक्षण झाले आहे. लहानपणापासूनच वाहनांचे आकर्षण असल्यामुळे सातवीपयर्ंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एका गॅरेजमध्ये वाहनांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. सध्या ते सांगली-कर्नाळ रोडवरील एका गॅरेजचे चालक आहेत. आपण स्वत: एक चारचाकी गाडी तयार करावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. यु ट्यूबवरील काही व्हिडीओ पाहून त्यांनी भंगारातील साहित्यातून कार निर्मितीचा ध्यास घेतला. गेल्या दोन वर्षांच्या धडपडीनंतर त्यांनी जुनी एम ८0 आणि रिक्षाचे साहित्य वापरून एक कार तयार केली आहे. ही कार फोर्ड कंपनीच्या जुन्या कार सारखीच आहे. हँड किकवर सुरू होणारी ही गाडी प्रेटोलवर चालते. प्रतिलिटर ३0 किमी धावणार्‍या गाडीत चार माणसं आरामात बसतात.

    फोर्डची डुप्लिकेट कार तयार करण्यासाठी अशोक आवटी यांना केवळ ३0 हजार रुपये खर्च करावे लागले. या कारमध्ये एलईडी लाईट, इंडिकेटर, हॉर्न अशा सर्व सुविधा आहेत. याशिवाय जुन्या लूकमुळे ही कार विशेष आकर्षण ठरते. सातवीपयर्ंत शिक्षण झालेल्या अशोक आवटी यांनी तयार केलेल्या या प्रयत्नाचे सांगलीकरांकडून विशेष कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code