Header Ads Widget

रेल्वेचे तिकीट १0 ते ५0 रुपयांनी महागणार

  नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी तसेच पुन:बांधणीसाठी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला हात घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी लागणारा निधी आता टिकिटांवर अतिरिक्त पैसे आकारुन उभारला जाणार आहे. या पैशांना स्टेशन डेव्हलपमेंट फी असे नाव देण्यात आले आहे.

  प्रत्येक प्रवाशाकडून तो कोणत्या श्रेणीने प्रवास करत आहे यानुसार ही रक्कम किती असेल हे निश्‍चित केले जाणार आहे. सवार्सामान्यपणे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये (म्हणजेच फस्र्ट क्लास, एसी क्लास) प्रवास करणार्‍यांना प्रत्येक तिकीटामागे १0 ते ५0 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. हे शुल्क आकारण्यासंदर्भात रेल्वेने वेगवेगळे नियम निश्‍चित केले आहेत. यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे निर्देशक (प्रवासी विपणन) विपुल सिंघल यांनी एक अधिकृत पत्र जारी करून माहिती दिली आहे.वेगवेगळ्या प्रमाणात ही एसडीएफ म्हणजेच स्टेशन डेव्हलपमेंट फीज आकारली जाणार आहे.

  आरक्षण न केलेले प्रवासी (उपनगरीय रेल्वे वगळता)

  * साधारण ट्रेन (सेकेण्ड क्लास) - १0 रुपये
  * मेल/एक्सप्रेस ट्रेन (सेकेण्ड क्लास) - १0 रुपये
  * फस्र्ट क्लास - १0 रुपये
  * एसी एमईएमयू/डीईएमयू - १0 रुपये

  आरक्षण केलेले मात्र नॉन एसी (उपनगरीय रेल्वे वगळून)

  * सेकेण्ड क्लास - २५ रुपये
  * स्लीपर क्लास साधारण - २५ रुपये
  * स्लीपर क्लास (मेल किंवा एक्सप्रेस) - २५ रुपये
  * फस्र्ट क्लास - २५ रुपये
  * आरक्षण केलेले एसी क्लास

  एसी चेअर क्लास ५0 रुपये

  * एसी थ्री टीयर/ थ्री एसी इकनॉमी क्लास ५0 रुपये
  * एसी टू टीयर ५0 रुपये
  * एसी फस्र्ट क्लास/ईसी/ईए/एसी विस्टाडोम ५0 रुपये

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या