नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता जारी केला आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्त्यात सरकारने दहा कोटींहून अधिक शेतकर्यांच्या खात्यात २0 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत, सरकारकडून लाभार्थी शेतकर्यांना एका आर्थिक वर्षात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ४ महिन्यांच्या अंतराने २हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकर्यांच्या खात्यात जमा केले जातात. या पैशातून शेतकरी बियाणे आणि खते यासारख्या आवश्यक गोष्टी सहज खरेदी करू शकतात.आतापयर्ंत या योजनेचे ९ हप्ते शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. सरकारने देशातील ११.३७ कोटींहून अधिक शेतकर्यांच्या बँक खात्यांमध्ये १.५८ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे.
- शेतकर्यांना मिळणार चार हजार रुपये
ज्या शेतकर्यांना अद्याप नवव्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र जमा होतील. म्हणजेच चार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. पण ही सुविधा फक्त त्या शेतकर्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी ३0 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे. तुमचे नाव पीएल किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्त्याच्या यादीत नसल्यास हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता. १५५२६१ आणि 0११-२४३00६0६ हे क्रमांक आहेत . येथे तुमचा संपूर्ण मुद्दा ऐकला जाईल आणि कमी वेळेत त्यावर तोडगाही काढला जाईल.