• Mon. Sep 25th, 2023

हृतिकची पूर्वार्शमीची पत्नी सुझान खानचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह

    मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे ठिकठिकाणी ओमिक्रॉनचा धोकाही वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे. त्यानंतर आता ओमिक्रॉननेही बॉलिवूडमध्ये शिरकाव केला आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वार्शमीची पत्नी सुझान खानला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तिने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    सुझान खान ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शअर करत याबाबतची माहिती दिली आहे. यावर तिने म्हटले की, गेली दोन वर्षे कोव्हिड १९ ला चकवा दिल्यानंतर तिसर्‍या वर्षी २0२२ मधील ओमायक्रॉन व्हेरियंटने माझ्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला केला आहे. काल रात्री माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया सुरक्षित रहा आणि स्वत:ची काळजी घ्या. हे खूप संसर्गजन्य आहे, असे तिने सांगितले आहे.

    दरम्यान तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला लवकर बरी होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सुझानच्या या पोस्टवर अभिनेता अर्सलन गोणीनेही तीन हार्ट, किस इमोजीचा वापर करत कमेंट केली आहे. तू लवकरच बरी होशील, अशी कमेंट अर्सलन गोणीने केली आहे. त्यावर सुझाननेही कमेंट करत होय मी तुझे आभार मानेन, असे म्हटले आहे.

    हृतिक आणि सुझानचा २0१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या मैं हीरो बोल रहा हूं या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,