• Tue. Sep 19th, 2023

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १८ ला निवडणुका

    * मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर : २१ ला मतमोजणी

    मुंबई : येत्या १८ जानेवारी रोजी राज्यातील ९५ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका, दोन जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकांसाठीही मतदान होत आहे. त्यामुळे सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सावर्जनिक सुट्टी देण्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.

    राज्यातील ठाणे, रायगड, र%ागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील ९५ नगरपंचायतींकरिता निवडणुका होत आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी ७ पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकांकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल, असे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवगार्तून भरण्यासाठी १८ जानेवारी रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे २१ रोजी मतमोजणी सर्व ठिकाणी एकाच दिवशी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,