शोधण्या ईश्वर

    देवाला शोधण्या, जातो मंदिरात
    मैल हा मनात, घेऊनिया
    सांग ना माणसा , दिसेल का देव
      नसतांना भाव, हृदयात?
      बनुनी निःस्वार्थी, कर्म सदा कर
      पावेल ईश्वर, नित्य तुला
      मन शुद्ध ठेव, मूर्ख ठरू नको
      घात करू नको, कोणाचाही
      दुसऱ्यांना सुखी , नित्यची ठेवावे
      मानवा मानावे, हरिहर
      तुझ्याच कर्माचे, तुला मिळे फळ
      सत्यासाठी लढ, उठ जरा
      सेवा जननीची, तुझ्याच रे हाती
      सत्याची ही ज्योती, पेटवण्या
      दिसे माणसात, तेव्हा तुला देव
      शुद्ध अंतर्भाव, तुझे असो
      बघण्या ईश्वर , शोध माणसात
      नको दगडात , त्याला शोधू
      -प्रतीक्षा गजानन मांडवकर
      पिंपळगाव यवतमाळ
      ८३०८६८४८६५