• Mon. May 29th, 2023

रोहित राऊत-जुईली जोगळेकरची लगीनघाई

    मुंबई : गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुईली-रोहितच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

    नुकताच या दोघांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला.जुईली आणि रोहित गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर या दोघांनी आपलं नातं ह्यऑफिशिअल केलं होतं. एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो हे दोघं चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सारेगमप लिटील चॅम्प या शोमुळे रोहितला विशेष लोकप्रियता मिळाली. रोहित आणि जुईली अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसले आहेत. जुईलीने अनेक मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत. ह्यसा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या मंचावरच या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. रोहित या कार्यक्रमाचा विजेता ठरला होता.

    येत्या २३ जानेवारी रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *