राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार

    * चांदूरबाजार येथे शासकीय तूर खरेदीस सुरवात

    अमरावती : चांदूरबाजार स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते आज करण्यात आला.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. आणि तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत नाफेड तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ राज्यमंत्री श्री. कडू यांचे हस्ते आधारभूत दराने तूर खरेदी करुन यावेळी करण्यात आला. केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेतंर्गंत हंगाम 2021-22 साठी नाफेडचा तूर हमीभाव 6हजार 300 प्रति क्विंटल एवढा आहे.

    राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. तसेच तूर विक्रीस आणणारे शेतकरी दिवाकर राऊत, रा. बेलोरा यांचा शाल, श्रीफळ व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.

    प्रारंभी समितीचे सभापती सतीश धोंडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजी बंड, उपाध्यक्ष श्रीपाद आसरकर यांनी श्री. कडू यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार केला. बाजार समितीचे सचिव मनीष भारंबे, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक अशोक सिनकर, खरेदी-विक्री केंद्राचे उपाध्यक्ष श्रीपाद आसरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश धोंडे, उपसभापती अरविंद लंगोटे, मार्केटिंग फेडरेशन पणन व्यवस्थापक उमेश देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

    खरेदी विक्री संस्थेचे संचालक श्रीपाद आसरकर, संजय गुर्जर, रमेश घुलशे, डॉ. मोहोड, डॉ. किटुकले, साहेबराव पोहोकार, नामदेव शेकार, संचालक मंगेश देशमुख, सुभाष मेश्राम आदी यावेळी उपस्थित होते.