- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि.१४ ते २८ जानेवारी २०२२ या कालावधी मध्ये संपन्न होत आहे, त्यानिमित्त कवी व लेखक प्रा.अरुण बुंदेले यांचा ” मातृभाषा पंधरवडा” हा अंभग प्रकाशित करीत आहोत.
- संपादक
- —————–
- नवीन वर्षाला । देऊ शुभेच्छा ।
- लिहू सदिच्छा । मराठीत॥१॥
- मराठीत लिहा । मराठीत बोला।
- वाचू मराठीला। आपणच॥२॥
- पत्र मराठीत। पाटी मराठीत।
- सही मराठीत। वाचवाया॥३॥
- असे कपाटात । ग्रंथ मराठीचे।
- धडे संस्कृतीचे। घरातच॥४॥
- मराठी संस्कृती। टिकवून ठेऊ।
- मराठीचे गाऊ। गोड गीत॥५॥
- मराठी शाळेत। शिक्षण देऊन।
- मराठीचा मान। वाढवू या॥६॥
- सर्व व्यवहार। करु मराठीत।
- मराठीची वात। पेटवू या ॥७॥
- मराठी वापरू। सर्वच क्षेत्रात।
- मराठीचं नातं। घट्ट करू॥८॥
- मराठी भाषेला। करू वृद्धिंगत।
- पंधरवड्यात। सर्वत्रच॥९॥
- साहित्य मेळावे। कथेचे कथन।
- कविसंमेलन । घेत जावे ॥१०॥
- मराठी माणूस। समृद्ध मराठी।
- श्रीमंत मराठी। करणार॥११॥
- भाषा संवर्धन। हा पंधरवडा।
- मराठीचा सडा। अंगणात॥१२॥
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर,अमरावती
- भ्र.ध्व.:-८०८७७४८०९